जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटे आणि मदत कार्याला वेग

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

रत्नागिरी, चिपळूण, खेड, सातारा, कोल्हापूर आणि रायगड  जिल्ह्यात पूरस्थितीने हाहाकार उडवला आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून घराघराला त्याची झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे प्रशासनाने सुचवलेल्या भागात अन्नाची पाकिटे वाटण्यात येत आहेत. संस्थानचे अंदाजे 1500 ते 2000 कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका या सेवेत सहभागी झाल्या आहेत. येथील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.

पूरग्रस्त भागातील पूर ओसरला असला तरी लोकांना मदतीची आवश्यकता आहे. घराघरामध्ये अन्न शिजवावे अशी परिस्थिती नाही. अशावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान लोकांच्या मदतीला धावले आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते तिथे प्रशासनाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन खिचडीची पाकिटे वाटण्यात आली. चिपळूणचे तहसीलदार डॉ. जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नदान करण्यात आले. पुरात अडकलेल्या काही लोकांची येथील सती हायस्कूलमध्ये निवाऱ्याची सोय केली आहे. तिथेही ही अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. सती नाका, पिंपळी समर्थनगरे येथेही पाकिटे वाटली. अगदी वेळेत ही पाकिटे मिळाल्याने येथील स्थलांतरीतामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

रात्री उशीरापर्यंत असे वाटप करण्यात आले. संस्थानतर्फे सावर्डे येथे अन्न व पाकिटे तयार करण्यात आली. तेथील गाळ व कचरा ऊचलण्याचे कार्य जोरात चालु आहे. संस्थानच्यावतीने अशी कठीण प्रसंगी राबवण्यात येत असलेल्या या सेवेचे चिपळूणचे आमदार शेखर निकम, तहसीलदार सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी कौतुक केले. वाटपप्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानचे 1500 ते 2000 कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत कार्यरत आहेत.

अविनाश जागुष्टे, सुनील वीर, राजन बोडेकर, सुनिल मोहिले, दिलीप मोहिरे, संतोष बिजीतकर, सिद्धेश रहाटे, आशिष शिवगण, प्रथमेश मोहिरे आदी या मदतकार्यात सहभागी होते. या विभागाचे सर्कल, तलाठी व पोलिस पाटील यावेळी उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महापूर, दुष्काळ, कोरोना अशा काळात संकटाच्या काळात वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. जनसेवेचा वसा घेतलेल्या सर्वांचे श्री संप्रदाय इगतपूरी तालुका कमिटीच्या वतीने अध्यक्ष संतोष थोरात, महिला अध्यक्ष मनीषा गतीर, निरीक्षक राजेंद्र उदावंत आदींनी आभार मानले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!