इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील रामचंद्र जाधव यांनी सहकारी संस्था गट आणि इतर मागासवर्ग गटातून भरलेले नामनिर्देशनपत्र अवैध ठरवल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांचा आदेश रद्द ठरवण्यात आला आहे. सुनील जाधव यांचे दोन्ही नामनिर्देशनपत्र कायम ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी याबाबत आदेश पारित केला आहे. नामनिर्देशनपत्र छाननीवेळी उदय देवराम जाधव यांनी काही मुद्यावर हरकत घेतल्याने सुनील जाधव यांचे दोन्ही नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यात आले होते. त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सतीश खरे यांच्याकडे अपील दाखल केले होते. यावर दोन्ही पक्षकारांना उचित संधी देऊन सुनावणी कामकाज घेण्यात आले. सुनील जाधव यांचे दोन्ही नामनिर्देशनपत्र मंजूर झाल्याचा आदेश देण्यात आल्याने ते आता निवडणूक रिंगणात कायम राहणार आहेत. अखेर सत्याचा विजय झाल्याशिवाय रहात नाही अशी प्रतिक्रिया सुनील रामचंद्र जाधव यांनी दिली. उदय देवराम जाधव यांच्या वतीने ॲड. विजय शिंदे, सुनील रामचंद्र जाधव यांच्या वतीने ॲड. एस. जी. सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group