वाढोलीचे मुख्याध्यापक भाऊसाहेब पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

वाढोली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब लक्ष्मण पवार ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिम्मीताने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तळवाडे केंद्राचे केंद्रप्रमूख धनराज वाणी, केंद्रातील सर्व शिक्षक, सर्व  गावकरी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. अमृत जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सरांच्या आठवणींना उजाळा दिला. सुत्रसंचालन भाग्यश्री गांगुर्डे यांनी केले. मुख्याध्यापक अशोक ठाकरे व संपूर्ण शिक्षकांनी भेटवस्तू , शाल श्रीफळ देवून पवार यांचा सपत्नीक सत्कार केला. अमोल नरवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विध्यार्थ्यांना शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप पवार, चित्रा नाडेकर, स्वाती बोरसे, छाया ठोके, शत्रुघ्न उबरहांडे आदी शिक्षकांनी मेहनत घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद महाले, उपाध्यक्ष निवृत्ती महाले, कचरु महाले, संतोष भालेराव, सोनु महाले,बगोकुळ तांबडे,बअरुण तांबडे, समाधान महाले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!