कुलदीप चौधरी यांच्याकडून कोविड सेंटरला विविध साहित्याची मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )

कोविड संसर्गाच्या काळात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या उपचारासाठी हँडग्लोज व मास्कची मोठ्या प्रमाणात गरज लागते. इगतपुरी व एकलव्य कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र शासनाकडुन हँडग्लोज व मास्कचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी यांना सांगितले. त्यांनी तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर व एकलव्य कोविड सेंटरला मोफत हँडग्लोज, मास्क आदी साहित्य स्वखर्चाने भेट दिले. कुलदीप चौधरी यांच्यावतीने गेल्या महिनाभरापासुन या दोन्ही कोविड सेंटर मधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रोज चहा व बिस्कीटचे मोफत वाटप चालु आहे.
साहित्या आभावी कोणत्याही रूग्णाचा उपचार न थांबता तत्पर मदत व्हावी या अपेक्षाने चौधरी यांनी ही मदत केल्याची माहिती दिली. या अगोदरही कोरोना काळात चौधरी यांनी कोविड सेंटरला भरपुर मदतीचे सहकार्य करीत दातृत्वाची भुमिका बजावल्याने डॉक्टरसह रूग्णांनीही त्यांचे आभार मानले. या प्रसंगी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, माजी सरपंच समाधान जाधव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळा गव्हाणे, घोटी शहर प्रमुख गणेश काळे, उपप्रमुख विक्रम मुनोत, विक्रम जगताप, निलेश आंबेकर, निलेश बुधवारे, फार्मासिस्ट आदमाने, अनंत पासलकर, ब्रदर चकोर, आंबोळे, बागुल आदी उपस्थित होते.

Similar Posts

Comments

Leave a Reply

error: Content is protected !!