दसरा मेळाव्याला जाणाऱ्या बसच्या अपघातात १० जण जखमी ; इगतपुरीजवळील घटना

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गट शिवसेना दसरा मेळाव्याला यवतमाळहून जाणाऱ्या खासगी बसला नवीन कसारा घाटात अपघात झाला आहे. ह्या अपघातात बसमधील  ८ ते १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवीन कसारा घाटाच्या वळणावर  साइडला बंद पडलेला एक ट्रक उभा होता त्यामागे छोटा हत्ती येऊन थांबला. नंतर मागून येणाऱ्या शिंदे गटाच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने ही बस छोटा हत्तीवर जाऊन आदळली. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग, आपत्ती व्यवस्थापन टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मुंबई नासिक एक्सप्रेसवेचे रूट पेट्रोलिंग अधिकारी रवि देहाडे, सहकारी दीपक मावरीया, सचिन भडांगे, संदीप म्हसणे, भाऊ पासलकर, सुदाम शिंदे आदींनी मोलाचे मदतकार्य केले.

Similar Posts

error: Content is protected !!