इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
सेवा मारुतीच्या माफक किंमती आणि दर्जेदार वाहनांमुळे सामान्य नागरिक सुद्धा चारचाकीचे स्वप्न पाहू लागले आहेत. यासह मारुतीची सेवा सुद्धा उत्तम असल्याने नागरिक समाधानी आहेत. यापुढेही अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी सेवा मारुतीने प्रयत्न करावेत. सामान्य माणसाच्या मारुतीला इगतपुरी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो असे प्रतिपादन घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी केले. सेवा मारुतीच्या वॅगनर आणि सेलिरोओ ह्या वाहनांच्या अत्याधुनिक मॉडेलचा शुभारंभ तुकाराम वारघडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी सांगितले सामान्य माणसासाठी कार्यरत असतांना मारुतीच्या दर्जेदार चारचाकीमुळे प्रवास सुखरूप झाला आहे. त्यामुळे जनसेवा करण्यासाठी चांगले साहाय्य मिळत असल्याचे ते शेवटी म्हणाले. तुकाराम वारघडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, पिंटू राव, मुकणेचे सरपंच भास्कर राव, माजी सरपंच जयराम धांडे, केशव वारघडे, निंबाळकर दादा, पोपट चारोस्कर, राजु आंबेकर, गोपी धांडे, विकास पोटकुले, सुनिल वारघडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते. सेवा मारुतीचे व्यवस्थापक विनोद तांबे, रवी गायखे, मुकुंद साबळे, किरण बैरागी, किरण मोरे यांनी यावेळी उपस्थितांना सेवा मारुतीच्या वाहनांची माहिती देऊन जनतेला चांगली सेवा देण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. तुकाराम वारघडे यांनी उपस्थितांचे आभार म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हस्ते वाहनांचा शुभारंभ केल्याबद्धल कृतज्ञता व्यक्त केली.