त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संवाद मेळावा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक संवाद मेळावा संपन्न झाला. हा मेळावा जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या मार्गदर्शनाने युवा नेते ज्ञानेश्वर महाले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष देवा बेंडकोळी, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष किरण चौधरी, समता परिषदेचे गोकुळ बत्ताशे आदी उपस्थित होते. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी युवक संवाद मेळाव्याचा उद्देश, पक्षाचे ध्येय धोरणे आणि पुढील वाटचाल याबाबतचे मार्गदर्शन करून येणाऱ्या काळात इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी मनोगत व्यक्त केले.

त्र्यंबकेश्वर येथील शिवराम झोले, वेदांत फडके व ब्राम्हणवाडे येथील समाधान चोथे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. माजी आमदार शिवराम झोले व कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांच्या हस्ते सर्वाचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष बहिरु मुळाणे यांनी राष्ट्रवादी महायुतीमध्ये सामील झाला असून सर्वसामान्य माणसाचा विकास हेच आपले कार्य आहे. सर्वांनी तळागाळापर्यंत पोहचवुन हे आपले सरकार आहे याची आणि शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम युवकांनी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमावेळी प्रफुल्ल पाटील, हिमांशू देवरे, कपिल भावले, ओमकार पन्हाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर महाले यांनी तर आभार जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांनी मानले.

Similar Posts

error: Content is protected !!