कुऱ्हेगावच्या उपसरपंचपदी सुरेखा बाळू धोंगडे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज विशेष बैठक घेण्यात आली. अत्यंत खेळीमेळीत पार पडलेली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी सुरेखा बाळू धोंगडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते बाळू शिवराम धोंगडे यांच्या त्या सौभाग्यवती आहेत.

यावेळी पॅनलचे मार्गदर्शक भाऊसाहेब सुखदेव धोंगडे, गंगाराम आप्पा धोंगडे, दत्तू दामू धोंगडे, अशोक दगडू धोंगडे, देवराम जयराम पवार, रोहिदास आण्णा धोंगडे, रमेश गव्हाणे, अर्जुन विठोबा धोंगडे, जेष्ठ नेते तुकाराम धोंडू धोंगडे, रामदासबुवा धोंगडे, माजी सरपंच राजाराम नारायण धोंगडे, शिवसेना शाखाप्रमुख विष्णू धोंगडे, प्रकाश गव्हाणे, बाळू पवार, ज्ञानेश्वर पाटील धोंगडे, बाबुराव अर्जुन धोंगडे, संदीप गव्हाणे उपस्थित होते. बैठकीवेळी ग्रामपंचायत सदस्य भगवान धोंगडे, बाळू धोंगडे, नामदेव धोंगडे, विशाल गहाणे, जितेंद्र पवार, जयराम गव्हाणे आदींसह गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला.

कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे कामकाज लोकाभिमुख असून ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विकास होत आहे. नूतन उपसरपंच सुरेखा धोंगडे यांच्यासह आम्ही सर्वजण आगामी काळात ग्रामविकास साधण्यासाठी तत्पर राहू.
- भाऊसाहेब धोंगडे, लोकनियुक्त सरपंच कुऱ्हेगाव