मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा मतदारसंघ समितीच्या अध्यक्षपदी आमदार हिरामण खोसकर : सदस्यपदी रवींद्र भोये, पल्लवी शिंदे यांची पालकमंत्र्यांकडून निवड

इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघनिहाय समिती गठीत करण्यात आली आहे. ह्या समितीच्या अध्यक्षपदी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांची निवड करण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. दादा भुसे यांनी पत्राद्वारे निवडीची घोषणा केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ह्या समितीमध्ये ३ अशासकिय सदस्यांची निवड पालकमंत्री यांच्यामार्फत करण्याबाबत शासन निर्णय असूनयाअनुषंगाने ही समिती स्थापित करण्यात आली आहे. शासन आदेश दिनांक २५ जुलै, २०२४ अन्वये इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघनिहाय समितीच्या अध्यक्षपदी आमदार हिरामण खोसकर, सदस्यपदी रविंद्र तुकाराम भोये मु. पो. दलपतपुर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक,   पल्लवी नितीन शिंदे, मु. पो. घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांची केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. नवीन समितीच्या निवडीबद्धल इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!