समता पॅनलच्या २१ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन : दैदीप्यमान कार्यामुळे समता पॅनलचा विजय निश्चित

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक या सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक २ जुलैला होत आहे. बॅंकेचे कार्यक्षेत्र संपुर्ण जिल्हाभर असून मतदार संख्या १३ हजार २४० आहे. ही निवडणुक समता पॅनलतर्फे लढवली जात आहे. समता पॅनलमध्ये सुधीर निंबा पगार, गणेश भिमा वाघ, विजयकुमार भाऊसाहेब हळदे, अमित शामराव आडके, दिपक बाबुराव अहिरे, प्रितीश अशोक सरोदे, प्रविण लक्ष्मण भाबड, संदिप वाळीबा दराडे, प्रशांत त्र्यंबक गोवर्धने, हेमंत जगन्नाथ देवरे, प्रशांत सर्जेराव कवडे, अमित मगन पाटील, विजय बाबुराव खातळे, प्रदिप रतन अहिरे, शशिकांत दौलतराव वाघ, मंगला बबनराव ठाकरे, सुरेश पुंडलिक चौधरी, सरिता नानाजी पानसरे, राजेश अण्णा निकुंभ, सतिश शिवाजी भोरकडे, मिर्झा गफुर बेग इसा बेग हे २१ उमेदवार असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन समता पॅनलचे प्रणेते रमेश राख, भाऊसाहेब खातळे यांनी केले आहे. गेल्या २७ वर्षाच्या काळात सभासदांच्या आशीर्वादासह भक्कम पाठिंब्यावर समता पॅनलचे उमेदवार बहुसंख्येने निवडून आलेले आहेत.

याकाळात समता पॅनलने दैदीप्यमान कामगिरी केलेली आहे. समता पॅनलच्या संचालकांनी केलेल्या कामकाजाची तुलनात्मक आकडेवारी ( रुपये कोटींमध्ये ) खाली दर्शविलेली आहे. भाग भांडवल ३.४१ वरुन २०.५८ ( ६ पट ), राखीव निधी ०.८० वरुन २४.६० ( ३१ पट ), ठेवी ३.१५ वरून ३३४.७० ( १०६ पट ), कर्ज वितरण ६.५५ वरून २२९.२४ ( ३५ पट), गुंतवणूक १.२१ वरुन १३०.४९ ( १०७ पट ), बँकेचा एकूण नफा ०.४४ वरून ५१३.६४ ( ११.५० पट ) व खेळते भांडवल ८.२१ वरून ३८२.३९ ( ४७ पट ) झालेले आहे. कर्ज मर्यादा ३० हजारांवरून २० लक्ष अशी लक्षणीय वाढ झालेली आहे. सर्वात दैदीप्यमान कामगिरी म्हणजे वैयक्तिक कर्जाचा व्याजदर १६ वरुन ११ टक्के इतका कमी करण्यात आलेला आहे. कर्जदार सभासदांसाठी जुन २०१६ पासून विमा योजना सुरू करण्यात आली असून आजपावेतो ६ कोटी ७० लक्ष इतका लाभ मयत सभासदांच्या कुटुंबाला देण्यात आलेला आहे. बँकेचा कारभार शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीनुसार करण्यात येत असते. तत्कालीन काही संचालकांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांना पॅनलमध्ये उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्याने ते विरोधी गटात सामील झाले. परंतु सभासदांना या संचालकांची कामगिरी माहीत असल्याने यांच्या खोट्या प्रचाराला सभासद कदापी दाद देणार नाही. याचा अनुभव सर्वांना गेल्या अनेक निवडणुकांपासुन आहे. ११ संचालक सोडून गेल्याचा दावा करण्यात येत असला तरी समता पॅनलवर त्याचा काही परिणाम होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. समता पॅनलचे सर्व २१ उमेदवार विजयी होणार आहेत यात अजिबात शंका नाही अशी माहिती pan

बँकेच्या दैदिप्यमान यशात सेवानिवृत्त सभासदांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व सेवानिवृत्त सभासद हे वडीलकीच्या भुमिकेतुन आवश्यक त्या ठिकाणी बँकेच्या स्थैर्यासाठी व सभासदांच्या हितासाठी मार्गदर्शन करत असतात. सेवानिवृत्त झाले तरी ते मार्गदर्शकाच्या भुमिकेतुन सतत संपर्कात असतात. या सर्वांची निवृत्ती नंतरची कष्टाची पुंजी बँकेत ठेवरुपाने सुरक्षित ठेवलेली आहे. बँकेच्या एकुण भागभांडवला पैकी १६ टक्के व ठेवी पैकी ४२ टक्के रकमा या निवृत्त सभासदांच्या आहेत. या आर्थिक स्थैर्यावरच बँक यशस्वीरीत्या कामकाज करत आहे. सहकार निवडणुक प्राधिकरणाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँका व पतसंस्थांमधे सभासद असलेल्या सेवानिवृत्त सभासदांचा सभासद व मतदानाचा अधिकार काढून घेतल्याने बँकेच्या ६ हजार सभासदांच्या हक्कावर गदा आली. त्‍यामुळे लगेचच बँकेचे सभासद, भागभांडवल व ठेवी कमी होऊन बँक अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला. या आदेशाविरुद्ध जेष्ठ सेवानिवृत्त मार्गदर्शक व बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या आदेशास स्थगिती घेत सेवानिवृत्त सभासदांचा सभासदत्वाचा व मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यात मोठे यश संपादन केले. यामुळे बँकेच्या आर्थिक स्थैर्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बँकेत CTS Clearing, NEFT/RTGS, Miss Call Alert, Mobile Banking, व Passbook Printing Machine या सारख्या डिजीटल सेवा सुरू करून सभासदांना राष्ट्रीयकृत बँकांच्या तोडीच्‍या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यात बँकेचे आधुनिकीकरण व सभासदा‍भिमुख सेवा उपलब्ध करण्यात येईल अशी घोषणा समता पॅनलचे प्रणेते रमेश राख, भाऊसाहेब खातळे यांनी केली.

Similar Posts

error: Content is protected !!