
इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलला मतदारांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यासह मुदतीमध्ये माघार न घेता आलेले उमेदवारही ह्याच पॅनलला साथ देत आहेत. सोसायटी गटातील सर्वसाधारण जागेवर उमेदवारी करीत असलेले उमेदवार संतू भिवाजी झनकर यांनी आज त्यांचा जाहीर पाठिंबा शेतकरी विकास पॅनलला घोषित केला आहे. मतपत्रिकेवरील कपबशी ह्याच चिन्हाला मतदान करावे असे त्यांनी म्हटले आहे. माघारीच्या वेळेत त्यांना काही कारणाने माघारीचे पत्र सादर करता आले नाही असे आहे. शेतकरी विकास पॅनल समावेशक आणि विकासात्मक पॅनल असून माझा जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे असे ते म्हणाले. पॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. दरम्यान कालच लता निवृत्ती गोवर्धने यांनीही पॅनलला पाठिंबा घोषित केलेला आहे.