
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फुट खोल दरीत आयशर कोसळल्याने २ जण जागीच ठार झाले आहे. आज गुरुवारी कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अपघातग्रस्त आयशर थेट संरक्षक भिंतीचे कठडे तोडून ३०० फुट खोल दरीत कोसळला असुन घटनेत दोन जण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांना अनेक तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अपघातातील दोनही मृतदेह जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.