
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोठी अर्थवाहिनी असणाऱ्या घोटी मर्चंटस को ऑप बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून बँकेवर सत्ता स्थापन करण्यात आली आहे. आज झालेल्या मतमोजणीमध्ये सोमनाथ अंबादास काळे, ईश्वरलाल मांगीलाल चोरडिया, दिपककुमार पन्नालाल चोरडिया, प्रशांत नंदलाल पिचा, विशाल विजयकुमार पिचा, चांदमल सोहनराज भन्साळी, ज्ञानेश्वर बजरंग भोर, सोमनाथ रामचंद्र लद्दड, सचिन शांतीलाल लोढा, मयुर रतन वालझाडे, मुकेश चंदूलाल शहा, उध्दव निवृत्ती हांडे हे उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सैंदाणे यांनी आपल्या पथकाकडून मतमोजणी पार पाडली. यापूर्वी रामदास शेलार, गणेश ढाकणे, रवींद्र अहिरे, नीलम कुमठ, मीनल पिचा हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला.