ग्रामपंचायत टिटोली आणि एसएमबीटी दंतशास्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

एसएमबीटी डेंटल इंस्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या दंतशास्र शाखेमार्फत टिटोली ग्रामपंचायतीद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोली येथे मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. ह्या शिबिरात डॉ. दीपक चौबे यांच्यावतीने उपस्थित गावकऱ्यांची दंत तपासणी करण्यात आली. डॉ. हाफिज अफ्तार, डॉ. मानसी व्यवहारे, डॉ. अक्षदा वाघ, डॉ. किन्नारी वोरा, डॉ. जुईली वेखंडे, डॉ. धनश्री वरात, डॉ. वैष्णवी वेले, डॉ. आशुतोष राठोड, डॉ. अभिषेक शेलार, सहकारी संतोष गाढवे यांच्या पथकाकडून दंत तपासणी व उपचार करण्यात आले.

डॉ. दीपक चौबे यांनी नागरिकांची जनजागृती करताना सांगितले की, शरीरातल्या विविध अंगांसारखेच दात हे महत्वाचे आहेत. आपल्या व्यक्तिमत्व विकासात दातांची महत्वाची भूमिका असते. दातांची पूर्णपणे काळजी घेणे महत्वाचे आहे. लहान वयात असताना बालकांना चॉकलेटसारख्या गोड पदार्थाची आवड मोठी असते. यामुळे शरीराला विटामिन मिळते. पण दातांची तपासणी वेळोवेळी न केल्याने दातांच्या सडण्याच्या क्रियेला सुरुवात होते. दात कमकुवत होतात. याचा त्रास त्यांना सोसावा लागतो. यासाठी आवश्यक असेल त्यावेळी दातांची तपासणी चिकित्सकाकडून करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बालकांसोबतच पालकांनीही या शिबिरात दंत तपासणी करुन शिबिराला मोठा प्रतिसाद दिला. समाजहित लक्षात घेता अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे आणि निस्वार्थ सेवा करुन समाज विकासात मोठे योगदान द्यायला पाहिजे असे मत आगरी सेना जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच अनिल भोपे यांनी व्यक्त केले.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री संग्राम सोशल ग्रुप व टिटोली ग्रामस्थ ह्यांनी सहकार्य केले. यावेळी टिटोलीचे सरपंच भरत गभाले, उपसरपंच अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्य, संदीप भडांगे, दशरथ हाडप, बाळू हाडप, दौलत बोंडे, ज्ञानेश्वर भटाटे, तानाजी बोंडे आदी उपस्थित होते. उपक्रमशील शिक्षक सिद्धार्थ सपकाळे, मुख्याध्यापिका मंगला शार्दूल, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!