इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत बेलगांव तऱ्हाळे आणि धामणी गावात राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांना डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराबाबत सखोल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वेढे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम घेण्यात आले.
राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना निमित्त आरोग्य कर्मचारी, आशा यांच्यामार्फत गावामध्ये कंटेनर सर्व्हे करण्यात आला. जागोजागी पाहणी करून दूषित कंटेनर रिकामे करण्यात आले. गावकऱ्यांना कोरडा दिवस पाळण्याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. आरोग्य सहाय्यक विजय आखाडे, मुरली ठाकुर, राजु जारवाल, महेश वालझाडे, अनिल मुंढे, आशा कार्यकर्ती वनिता वारुंगसे यांनी परिश्रम घेतले. पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सरपंच अशोक मोरे, उपसरपंच सुवर्णा आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, प्रमिला वारुंगसे, सुशीला तातळे आदींनी जनजागृतीसाठी कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केले.
स्वच्छता शपथ कार्यक्रमातून जनजागर
स्वच्छतेची शपथ उपक्रम बेलगांव तऱ्हाळे येथे राबवण्यात आला. यावेळी महिलांना स्वच्छतेबाबत, हात धुणे माहिती, मास्क वापर, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझर वापर करणे, घरातील आजारी व्यक्ती, लहान बालके यांची काळजी घेणे, विनाकारण कुटुंबातील व्यक्तींना फिरू न देणे, एकत्र न जमणे, आजारी पडल्यास डॉकटरशी संपर्क करणे, घर, परिसर, गावाची स्वच्छता राखणे, पाणी गाळून उकळून पिणे,
स्वच्छता बाबत जागृती याची माहिती दिली. यावेळी स्वच्छता शपथ घेण्यात आली. हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, जन शिक्षण संस्थेचे कार्यक्रम अधिकारी संदीप शिंदे, प्रताप देशमुख, सुखदेव मत्सागर, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला, युवती, ग्रामस्थ उपस्थित होते.