
इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक उलाढाल सुरु करण्याकडे लक्ष देणार असून अधिकाधिक कर्जपुरवठा कसा देता येईल यावर आमचा भर राहील असे प्रतिपादन देवळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित व्हॉइस चेअरमन योगेश सुरुडे यांनी केले. राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळे विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉइस चेअरमनपदी उभाडे येथील युवक काँग्रेसचे सरचिटणीस योगेश सुरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी व्हॉइस चेअरमन योगेश सुरुडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सभापती रघुनाथ तोकडे, माजी आमदार पांडुरंग गांगड यांच्या नेतृत्वाखाली ही बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ, उपाध्यक्ष जनार्दन माळी, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, विधानसभा अध्यक्ष किरण पागेरे, जिल्हा सरचिटणीस रामदास धांडे, तानाजी लक्ष्मण सुरुडे, रामचंद्र सुरुडे, बाळू सुरुडे, चंदनसिंग परदेशी, समाधान सुरुडे, निवृत्ती सुरुडे, जगन उंबरे, विजू परदेशी, संदीप सुरुडे, प्रशांत सुरुडे, बंडू सुरुडे, राजाराम सुरुडे, अर्जुन सुरुडे, देविदास सुरुडे, रामकृष्ण सुरुडे, विलास सुरुडे, सुरेश सुरुडे, संतु सुरुडे, स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, स्वराज्य गटप्रमुख बाळू दामू सुरुडे, संदीप सुरुडे, गोरख सुरुडे, विष्णू गवारे, मिलिंद भालेराव आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.