

इगतपुरीनामा न्यूज – आदर्श गाव मोडाळे येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांतुन मिळालेल्या ई घंटागाडीचे लोकार्पण आज करण्यात आले. या प्रकारच्या २ घंटागाड्या घेण्यात आल्या असून एका गाडीचा प्रातिनिधिक स्वरूपात गोरख बोडके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मोडाळेच्या विकासासाठी ओळखले जाणारे गोरख बोडके यांच्यामुळे गावाचे विविध प्रश्न सुटले असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. पर्यावरण पुरक इ घंटागाडीच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा बसणार असल्याने ग्रामस्थ आनंदी असल्याचे दिसून आले. इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव मोडाळे येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या पुढाकाराकातुन स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात पर्यावरण पुरक व प्रदूषण मुक्त ई रिक्षा दोन घंटागाड्या घेण्यात आल्या. गोरख बोडके यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच गावात घंटागाडी मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. मोडाळे गावाने आतापर्यंत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले असून आदर्श पुरस्कारही मिळालेले आहेत. घंटागाडीच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी मोडाळे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

