कु. प्रांजल पाटील हिचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ह्या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रांजल अमोल पाटील हिने NMMS परिक्षेत सुयश संपादन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील २८ विद्यार्थ्यांमध्ये कु. प्रांजल हिची निवड झाली असून ती शिष्यवृत्तीला पात्र झाली आहे.
तिच्या घवघवीत यशाबद्धल न्यू इंग्लिश स्कुल विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. वाघ यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे शिक्षक प्रकाश शेळके, बाळासाहेब सोनवणे, भाऊसाहेब जाधव, कुमुदिनी गायकवाड आदींचे मार्गदर्शन कु. प्रांजल हिला लाभले. तिच्या यशाबद्दल इगतपुरी तालुक्यातून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!