शेतकरी विकास पॅनलच्या झंजावाताला पिंपळगाव मोरचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांचा पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकऱ्यांच्या विकासासाठी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनेलला सर्व क्षेत्रातून पाठिंबा लाभत आहे. ह्या पॅनलचे चिन्ह कपबशी असून ह्या चिन्हावर फुलीचा ठसा मारून सर्व १८ उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन पिंपळगाव मोर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे ह्यांनी केले आहे. पंढरीनाथ काळे हे तालुक्यातील आपल्या अनेक समर्थकांच्या माध्यमातुन मतदारांच्या संपर्कात आहेत. शेतकरी विकास पॅनलचे पारडे सत्तेच्या दिशेने असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी ह्या पॅनलला पाठिंबा दर्शवला आहे. सहकार व बाजार समिती कारभाराचा दांडगा अनुभव असलेले शेतकरी विकास पॅनलचे १८ उमेदवार निवडून देऊन घोटी बाजार समितीला वैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन पंढरीनाथ काळे यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!