घोटी कृऊबा – ग्रा. पं. सदस्य संघर्ष समिती आणि वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत ठरलं : आम्ही आमचं मतदान देणार फक्त “यांनाच”…!

इगतपुरीनामा न्यूज – सर्वसामान्य शेतकरी, वंचित, गोरगरिबांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी परखड नेतृत्व करणाऱ्या  लोकनेते स्व.गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलला आमचा जाहीर पाठींबा आहे. पॅनलच्या १८ सक्षम उमेदवारांना कपबशी निशाणीवर ठसा देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, ग्रामपंचायत सदस्य संघर्ष समितीचे योगेश भरीत यांनी केले आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनल आघाडीवर आहे. इगतपुरी ग्रामपंचायत सदस्य संघर्ष समिती आणि वंचित बहुजन आघाडी यांनी पुढाकार घेऊन शेतकरी विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ग्रामपंचायत संघर्ष समिती आणि वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका यांच्या वतीने आज बैठक घेण्यात आली. यात एकमताने पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सर्वच उमेदवारांना निवडून देण्यासाठी कंबर कसणार असल्याचे सांगण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष  विक्रम जगताप, संघर्ष समितीचे योगेश भरीत, संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रभाकर चिकने यांनी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी राहुल जगताप, टाके घोटीचे माजी सरपंच मच्छिंद्र दोंदे, विजय चंद्रमोरे, रविंद्र घाटेसाव, सूनिल पगारे, बाळासाहेब सोनवणे, दशरथ गांगुर्डे, वंचित बहुजन आघाडीचे सचिव मिलिंद शिंदे, भुषण पंडित, डॉ. आर. वाय. गाडे, पत्रकार विशाल रोकडे उपस्थित होते. शेतकरी विकास पॅनलमध्ये सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव ह्या १८ उमेदवारांच्या कपबशी या चिन्हावर ठसा मारून शेतकरी विकास पॅनलला विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडी व संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!