धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात : खंडेराव झनकर आदींच्या मध्यस्थीला यश ; शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्यक्षात लोकांच्या मनामनात पोहोचवणारी शिवसेना सत्य आणि वास्तव आहे. सामान्य शिवसैनिक ह्यामुळेच उद्धव साहेबांच्या सोबत असल्याचे दिसून येते. गैरसमज निर्माण करून तालुक्यातील काही स्वार्थी लोकांनी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात ओढले. कैलास गाढवे, खंडेराव शिवराम झनकर, पांडुरंग गाढवे, हरीभाऊ वाजे, साहेबाराव झनकर यांच्यामुळे मला पुन्हा माझ्या हक्काच्या शिवसेनेत उद्धव साहेबांसाठी काम करण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे यांनी केले. मागील महिन्यात शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ते चर्चेत आले असले तरी ते पुन्हा मूळ शिवसेनेत दाखल झाल्याने धामणगाव खेड गटात आनंद झाला आहे असे खंडेराव शिवराम झनकर म्हणाले.

आमचे मित्र कट्टर शिवसैनिक सरपंच शिवाजी गाढवे यांच्याशी वेळोवेळी सविस्तर व्यक्तिगत चर्चा केली. धामणगावातील ज्येष्ठ शिवसैनिकांसह मी स्वतः त्यांना योग्य मार्गदर्शन केले. म्हणून आज खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या स्वपक्षात प्रवेश केला. त्यामुळे धामणगाव खेड गटातील शिवसैनिक आनंदी झाले आहेत.
- खंडेराव शिवराम झनकर, शिवसेना धामणगाव खेड गट

संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या आदेशानुसार उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, रमेश धांडे, गटप्रमुख साहेबराव झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणप्रमुख शिवाजी काळे, कैलास  गाढवे, खंडेराव शिवराम झनकर, पांडुरंग गाढवे, राजाभाऊ घोरपडे, बहिरू केवारे, चेअरमन नंदू गाढवे, शाखाप्रमुख शरद जाधव, नामदेव घुमरे, युवाशाखाप्रमूख राहुल गाढवे यांच्या उपस्थितीत धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे यांनी शिवसेनेत (उद्धव साहेब ) स्वगृही प्रवेश केला. धामणगाव गटामध्ये सर्व शिवसैनिक एकोप्याने विचार विनिमय करून निर्णय घेतात. सर्व शिवसैनिक प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असल्यामुळे पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात आगामी प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकवण्याचा संकल्प सर्व शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी धामणगाव सरपंच शिवाजी गाढवे यांचा स्वगृही प्रवेशाचा सोहळा धामणगाव खेड गटात केला जात आहे. शिवाजी गाढवे यांच्यामुळे पुन्हा एकदा पक्षाला मोठी बळकटी मिळेल असा विश्वास खंडेराव शिवराम झनकर यांनी व्यक्त केला आहे. माजी गटप्रमुख रामभाऊ परदेशी, युवा सेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, जिल्हा समन्वयक समाधान वारुंगसे, उपतालुकाप्रमुख सुदाम भोसले, भाऊसाहेब वाजे, हेमंत झनकर, गणप्रमुख भीमराव साबळे, सरपंच ज्ञानेश्वर मोंढे, गणेश टोचे, पोपटराव लहामगे, भास्कर वाजे, संघटक राधकिसन झनकर, सोमनाथ वारुंगसे,  जनक भोसले, कांतीलाल भोसले, शिवाजी भोर, अनिल झनकर, नवनाथ मोंढे, नंदू जाधव, शंकर चोथे, नवनाथ बऱ्हे, सागर साबळे, नवनाथ झनकर, लालमन भांडकोळी , अशोक बांबळे, दिलीप पोटकुले, साहेबराव बांबळे, बहिरू लगड, दत्तू झनकर आदींनी स्वागत केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!