
इगतपुरीनामा न्यूज – शालेय पोषण आहार संघटना महाराष्ट्र राज्य व आदिवासी नारिशक्ती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले. विविध तालुक्यातील तहसीलदारांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तथा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. MDM अन्न शिजवून देणे आणि इतर शाळा कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सर्व कामगारांना वर्ग ४ कर्मचारी दर्जा द्यावा, त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. ह्या प्रमुख मागण्यांसाठी रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील पेठ, सिन्नर, निफाड, येवला, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर इत्यादी तालुक्यातील तहसीलदारांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी ह्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा असे निवेदनात नमूद आहे. यावेळी आदिवासी नारिशक्तीच्या संस्थापक अध्यक्षा निता वारघडे यांच्या नेतृत्वाखाली संतोष भगत, शालू हंबीर, योगिता वाकचौरे, सुलोचना जाधव, जया भगत, गजाबाई, रंगूताई कोकणे, हिरामण महाले, महिंद्र राऊत, कबडी काका, गणपत काभाईत, विठ्ठल हिंदे, भास्कर वाघमारे, अनिता वाघमारे, सुमन बाळू गावंडा, आश्विनी शिरसाठ, शबनम पठाण, सुनीता पवार, संगीता आवली, बळवंत दळवी, कृष्णा भाऊ, कमलाकर भाऊ, सुनीता पाडवी आदी उपस्थित होते.
