
इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज माघार घेण्याचा अंतिम दिवस होता. माघारीनंतर लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी आज घोटी येथे ही घोषणा केली आहे.
१८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराला बुधवारपासूनच सुरुवात करून नारळ फोडण्यात आला आहे. मतदारांशी संपर्क साधला जात असून सर्वच जागा निवडून आणू असा दावा करण्यात आला.