कावनई येथे चक्रीवादळाच्या पावसाने पोल्ट्रीचे पत्रे उडुन २५० कोंबड्यांचा मृत्यू ; सव्वा लाखांच्या नुकसानीचा अंदाज

प्रभाकर आवारी इगतपुरीनामा न्यूज : मुकणे धरणाच्या कावनई भागात शुक्रवारी दुपारी ४ वाजे दरम्यान चक्रीवादळासह झालेल्या पावसाने पोल्ट्रीचे पत्रे उडून त्यातील २५०च्या आसपास कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मिनीनाथ गुळवे यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये अंदाजे १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळच्या तीव्रतेने धरणातील पाणी पावसाप्रमाणे हवेत उडतांना दिसत होते. आहे. धरणाच्या दिशेने चक्रीवादळ तयार होऊब जोरदार पाऊसही असल्याने हे वादळ थेट जवळच असलेल्या गुळवे यांच्या पोल्ट्रीफार्मवर आले. यात पोल्ट्रीफार्मवरील पत्रे फुटुन पोल्ट्री शेडमध्ये असलेल्या कोंबड्या मरण पावल्या. शेतीस जोडधंदा म्हणुन सुरू असलेल्या पोल्ट्रीचे चक्रीवादळाच्या पावसामुळे श्री. गुळवे यांचे जवळपास १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!