
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील भाऊ बुधा पारधी या आदिवासी कुटुंबाच्या राहत्या घराला मंगळवारी रात्रीच्या वेळी आग लागल्याने धान्यासह संसारपयोगी वस्तू, मुलीच्या लग्नासाठी आणून ठेवलेले कपडे आदी साहित्य पूर्णपणे जळून गेले आहे. उदरनिर्वाहाच्या वस्तू आगीत भस्मसात झाल्याने हे कुटुंब रस्त्यावर आले. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या कुटुंबाचे स्वराज्य पक्षाने सांत्वन केले. आज स्वराज्य पक्षाने या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. या कुटुंबाची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने ते हतबल झाले. पुढच्या महिन्यात ४ तारखेला असलेल्या त्यांच्या मुलीच्या लग्नातील जेवणाचा खर्च स्वराज पक्ष करणार असल्याचे स्वराज्य पक्ष व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख नारायण बाबा जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, तालुकाध्यक्ष नारायण भोसले, स्वराज्य समर्थक गौतम भोसले, सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश कुंदे, कुष्णा गभाले, व्यापारी आघाडी संघटक महेश जाधव, पप्पु शेलार, प्रहार संघटना तालुका उपाध्यक्ष सपन परदेशी, बहिरु भोसले, राजु भोसले, गणपत शिरसाठ, उमेश सुरुडे, गोरख सुरुडे, सरपंच संदीप कुंदे, ॲड. हनुमान मराडे, पोलीस पाटील रोहिदास काळे आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मुलीच्या लग्नाच्या सर्व जेवणाचा खर्च होणार असल्याने त्या कुटुंबाने त्यांचे आभार मानले.