लढा सामान्य इगतपुरीकरांसाठी – विविध मागण्यांसाठी इगतपुरीत नगरपरिषदेसमोर जागृत नागरिकांचे आमरण उपोषण : आजचा दुसरा दिवस ; इगतपुरीकरांचा वाढतोय पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्या या मागणीसाठी इगतपुरी येथील जागृत नागरिक समितीचे जेष्ठ नागरिक पुरणचंद लुणावत, किरण फलटणकर, अजित पारख, विशाल चांदवडकर, विलास कदम यांनी इगतपुरी नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज ह्या उपोषण आंदोलनाचा दुसरा दिवस असून या उपोषणाला सर्वपक्षीयांसह शहरातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. इगतपुरी शहर अंतर्गत सर्व रस्ते नळ पाईपलाईन टाकण्यासाठी खोदले मात्र पुन्हा या रस्त्यांची दुरुस्ती केली नसल्यामुळे गावाला भकास स्वरूप आले आहे. इगतपुरीत दरवर्षी पावसाळ्यात सुमारे चार हजार मि मी पावसाची नोंद होते मात्र गेल्या दहा वर्षापासुन १२ ही महिने आठवड्यातुन केवळ तीन दिवस नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पुर्ण शहरात केवळ एकच सार्वजनिक शौचालय आहे. त्यातच नळपट्टी व घरपट्टी बिलामधे वाढ केली आहे. शहरात गार्डनची व्यवस्था नाही. यामुळे जागृत नागरिक समितीचे जेष्ठ नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत. वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी रद्द करण्यात यावी, शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करण्यात यावे, शहरातुन जाणारा जुना मुंबई आग्रा महामार्ग त्वरित दुरुस्त करावा, सार्वजनिक शौचालय व सार्वजनिक पाणपोई उपलब्ध करून देण्यात यावी, वरीष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क व लहान मुलांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात यावे आदी मुलभुत सुविधा शहरातील नागरिकांना मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरुच राहील अशी भुमिका उपोषण कर्त्यांनी घेतली आहे.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!