लोकनेते गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचा कावनई येथे उद्या १० वाजता मेळावा : संदीप गुळवे, शिवराम झोले, निवृत्ती जाधव यांच्याकडून उपस्थित राहण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हमाल, व्यापारी, मापारी आदी मतदारांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्या बुधवारी सकाळी १० वाजता कावनई येथे हा महत्वाचा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सोसायट्यांचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हमाल, व्यापारी, मापारी आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी केले आहे. या मेळाव्यात अनेक महत्वाचे नियोजन करण्यात येणार असून सर्वांसाठी पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!