पाडळीजवळ अपघातात मुंढेगाव येथील १ ठार तर १ युवक गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 19

मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी फाटा कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या मोटारसायकलने टक्कर मारल्याने आज अपघात झाला. यामध्ये गणेश खंडू गतीर यांच्या डोक्याला मार लागल्याने ते ठार झाले आहेत. रमेश गतीर यांच्या पायास मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी घोटी पोलीस महामार्ग स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनीही मदतकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!