
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – रामनवमी निमित्त मुंबई ते शिर्डी मार्गावर मोठ्या संख्येने साई पालख्यांचे आगमन होत आहे. यामुळे इगतपुरीजवळील महामार्ग साई भक्तांमुळे फुलून निघाला आहे. मुंबई लालबाग येथील मानाच्या साईलीला पालखीचे कसारा घाट चढल्यानंतर इगतपुरी येथील सह्याद्री नगर दत्त मंदिरात आगमन झाले. या पालखीने विसावा घेतल्यानंतर साई भक्तांसाठी प्रभू नयन फाउंडेशन, श्री साई सहाय्य समिती यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. ह्याचा लाभ शेकडो साई भक्तांनी घेतला. यावेळी श्री साई समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, डॉ. विकी पाटील, डॉ. जान्हवी यादव, सागर जाधव, निखिल कर्पे, समीर यादव, संदीप यादव, उमेश शिरोळे, सुमित बोधक, प्रमोद डेंगळे, सचिन भागडे, साईलीला पालखीचे अध्यक्ष सुमित महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.