तळोशी येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह भावली धरणात आढळला

इगतपुरीनामा न्यूज, दि. 15

दोन दिवसापुर्वी तळोशी येथील बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह भावली धरणात आढळल्याने खळबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील महिला संगिता शिवाजी गुंजाळ वय ४७ ह्या दोन दिवसापुर्वी मैत्रिणीकडे जात आहे असे सांगुन घोटी शहरातुन बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज सकाळच्या वेळी संगिता गुंजाळ यांचा मृतदेह भावली धरणात आढळुन आला. मृत महिलेचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असल्याने ह्या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!