जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा यलो अलर्ट जारी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांचेकडून मिळालेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्यात आज ५ ते ९ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह ७ आणि ८ एप्रिल ह्या दिवशी यलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. या कळतं विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली आहे. ह्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!