आजपासून वाचकांच्या सेवेत!

“इगतपुरीनामा” वेब पोर्टल!

आजपासून वाचकांच्या सेवेत!

नमस्कार.!

इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात दररोज विविधांगी दैनंदिन घडामोडी घडत असतात. त्या अनुषंगाने दोन्ही तालुक्यातील अनेक वाचकांच्या आग्रहाखातर आम्ही घेऊन येत आहोत आपल्या सर्वांसाठी, आपल्या तालुक्यासाठी आपल्या हक्काचे ऑनलाईन व्यासपीठ!

‘इगतपुरीनामा’ वेब पोर्टल

या नव्या व्यासपीठावरून आम्ही इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समाज-मनाची मांडणी, प्रश्न, अडचणी, तुमचे छंद, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांची यशोगाथा, विद्यार्थ्यांना मनोरंजन आदी वाचनीय मजकूर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

गेल्या अनेक वर्षात पत्रकारितेच्या माध्यमातून आपण सर्व वाचक वर्गाशी आमचं एक अतूट आणि अनोखं नातं तयार झालं आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं या आपणा सर्वांच्या आग्रहाखातर ‘इगतपुरीनामा’ वेब पोर्टल या आपल्या हक्काच्या व्यासपीठाचा शुभारंभ करत आहोत. या माध्यमातून आपण इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त, गोरगरीब घटकांचे प्रश्न, समाजातील कष्टकरी, शेतकरी वर्गातील अडचणी, समाजातील राजकारणी, समाजसेवक, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांना त्यांच्या भावना मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. यासह विविध क्षेत्रातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा मागोवा घेण्याच्या हेतूने बातम्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आपणा सर्वांची साथ व आपणा सर्वांचा आशीर्वाद वाचक म्हणून आवश्यक आहे.! 🙏🙏

आपल्या या हक्काच्या व्यासपीठाला जरूर भेट द्या. वाचा, बोला, लिहा! व्यक्त व्हा!
त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇

igatpurinama.in

आपलाच :
श्री. भास्कर सोनवणे
आणि ‘इगतपुरीनामा’ परिवार

बातम्या /जाहिराती [email protected] ह्या मेलवरच स्वीकारल्या जातील ह्याची नोंद घ्यावी.

इगतपुरीनामा व्हॉटस अँप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/Gb7DmmZhzVaABOB57YUd1Q