लाठीचार्ज घटनेतील जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करा : मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण तातडीने द्या : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – जालना जिल्हातील अंतरवाली सराटी ता. अंबड येथील मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अशांत झाला आहे. या गंभीर घटनेची युद्धपातळीवर चौकशी करून संबंधित जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर  कठोर कारवाई करावी, मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण लवकर मिळण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. शासनाला केलेल्या मागणीचे निवेदन नासिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना आज देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला मागणीचे निवेदन पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देवळालीच्या आमदार आमदार सरोज आहिरे, अर्जुन टिळे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती महाराज अरिंगळे, सचिन पिंगळे, योगेश निसाळ, नासिक तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, विक्रम कोठुळे, बाळासाहेब म्हस्के आदी पदाधिकारी याप्रसंगी हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!