इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी येथील बलायदुरी जवळ असणाऱ्या रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य करणाऱ्या १० जणांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १० आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग, स्वतःसह इतरांना संसर्ग पसरण्यासाठी कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश असतांना ई पास न काढता नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला. विनापरवाना प्रवेश करून रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान अशा विविध प्रकरणी रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये सुधारणा होत नसल्याने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी हे रिसॉर्ट सीलबंद केले आहे.
मुंबईच्या घाटकोपर आणि गोरेगाव येथील राहणारे सचिन भांगजीभाई सावला वय 40, जगदिप मालसीभाई सतरा वय 40, सागर रायचंद सतरा वय 39, राजु खिमजी सतरा वय, 40, शेफाली राजु सतरा वय 48, डिम्पल जगदिप सतरा वय 39, त्रिशला सागर सतरा वय 38, मिना मनसुख सतरा वय 40, पायल सचिन सावला वय 41,मनसुर विरम सतरा वय 40 ह्या १० जणांनी जिल्हाबंदी असतांना नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला. ई पास न काढता त्यांनी इगतपुरी जवळील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य केले. जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे पालन न करता कोरोना आजाराचे संसर्ग स्व:ताला अगर समाजात पसरविण्याचा संभव आहे हे माहीत असतांना त्यांनी ही कृती केली. दहाही जणांनी अत्यावश्यक काम नसतांना, ई पास न घेता जिल्हाबंदीचे आदेश भंग केले. नाशिक जिल्ह्यात प्रवेश करून रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे येवुन वास्तव्य केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल वैभव एकनाथ वाणी यांनी फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group