छगनराव भुजबळ यांच्याबद्दल कोणताही अपशब्द आणि टीका खपवून घेणार नाही – आगरी सेना तालुकाप्रमुख नारायण वळकंदे : आमच्या दैवतासाठी आम्ही कायमच पाठीशी राहू

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्यातील ओबीसी जनतेच्या हृदयातील व्यक्तिमत्व तथा जेष्ठ नेते माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्याबद्दल कोणताही अपशब्द खपवून घेणार नाही. भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने लाभाची पदे आणि प्रतिष्ठा मिळुनही कृतघ्नतेने त्यांच्या विरोधात ओकत असलेली गरळ आमची सहनशिलता संपवणारी आहे. छगनराव भुजबळ यांच्याबद्धल यापुढे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना अद्धल घडवावी लागेल. यापुढे संबंधितांनी भान ठेवून भुजबळ यांच्याबद्दल बोलावे. अन्यथा आमच्या हृदयातील नेत्यासाठी आम्ही काहीही करायला मागेपुढे पाहणार नाही असा इशारा आगरी सेनेचे इगतपुरी तालुकाप्रमुख नारायण वळकंदे यांनी दिला आहे. 

अन्य पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी ओबीसी नेते माजी मंत्री छगनराव भुजबळ यांची पायधरणी केली. त्यानंतर त्यांच्यावरच काहीही कारण नसतांना टीका टिपण्णी सुरु केली. ही उलटण्याची गैरप्रवृत्ती सामान्य जनता सूक्ष्म नजरेतून पाहत आहे. याचा परिणाम संबंधितांना भविष्यात दिसून येणार आहे. मात्र आता यापुढे कोणीही मोठ्या छोट्या पदाधिकाऱ्याने माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्याबद्धल अपशब्द आणि गरळ ओकू नये. आमच्यासाठी छगनराव भुजबळ दैवत असून ह्या दैवताचा अपमान अजिबात सहन करणार नाही. आगरी सेना आणि कार्यकर्ते भुजबळ यांच्या कायम पाठीशी असून संबंधितांनी याची दखल न घेतल्यास आगरी सेना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा आगरी सेनेचे इगतपुरी तालुकाप्रमुख नारायण वळकंदे यांनी दिला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!