अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विविध गुणवंत पुरस्कार घोषित : ३० डिसेंबरला मोडाळे येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा ह्या गुणवंत पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. आदर्श जनसेवक पुरस्कार मोडाळेच्या विकासाचे शिल्पकार माजी जि.प. सदस्य गोरख बोडके, कर्मवीर माजी आमदार स्व. पुंजाबाबा गोवर्धने स्मृती पुरस्कार कष्टकऱ्यांचे नेते कॉ. राजु देसले, सहकार महर्षी स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती पुरस्कार पेशवे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे, वै. हभप किसन महाराज काजळे किर्तन केसरी स्मृती पुरस्कार हभप नामदेव महाराज डोळस, आदर्श धार्मिक देवस्थान व्यवस्थापन पुरस्कार कालिका मंदिर देवस्थानचे केशवराव पाटील, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे डॉ. महेंद्र शिरसाठ, आरोग्य दुत पुरस्कार डॉ. जयवंत जगताप, आदर्श आरोग्य सेवक रमेश आवारी, स्व. कवी स्वामी गायकर स्मृती पुरस्कार नंदकिशोर ठोंबरे, आदर्श युवा नेता पुरस्कार तुकाराम वारघडे, आदर्श साहित्यिक संस्थेचा महाराष्ट्र भुषण साहित्य संस्था पुरस्कार प्रतिभा साहित्य संघ अकोट, साहित्य भुषण पुरस्कार लेखक तानाजी धरणे, जीवन गौरव पुरस्कार सतीश जैन, सुशिला संकलेचा, बाळासाहेब पलटणे, आदर्श गाव पुरस्कार मोडाळे, शिरसाठे व आवळी दुमाला, आदर्श कामगार प्रदीप पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालय पुरस्कार ज्ञानदा विद्यालय मोडाळे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हनुमान दराडे, ज्योतिषाचार्य पुरस्कार नरेंद्र धारणे, आदर्श सरपंच पुरस्कार गणेश टोचे, शिवाजी गाढवे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक, निमंत्रक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी दिली आहे. पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजित १३ वे नवोदिताचें व ग्रामीण साहित्य संमेलनात माजी आमदार हेमंत टकले, संमेलनाध्यक्ष विजयकुमार मिठे, राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे आदींच्या हस्ते मोडाळे येथे सोमवारी ३० डिसेंबरला सकाळी ८ ते सायं.६ वाजता होणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!