
इगतपुरीनामा न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ५ जानेवारी २०२५ ला सकाळी १० वाजता रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजवळ, गंगापुर रोड नाशिक येथे हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांचे “समाज जीवन व शिक्षकांची भुमिका”, डॉ. सागर मंडलिक यांचे “बदलती जीवनशैली आणि आरोग्य” या विषयांवर व्याख्यान होणार आहे. व्याख्याणाच्या वैचारिक मेजवाणीसह जिल्ह्यातील विविध गुणवंत शिक्षकांना त्यांच्या आदर्श कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे राज्य सरचिटणीस कैलास बोढारे, राज्य कोषाध्यक्ष अनिल बागुल, नाशिक जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ सपकाळे, सरचिटणीस सुनिल मोरे, समन्वयक राहुल सोनवणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख दिपाली मोरे, पोपट घाणे, संतोष श्रीवंत, कोषाध्यक्ष कुंदन दाणी, कार्याध्यक्ष सुधाकर अहिरे यांच्यासह विविध तालुक्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.