इगतपुरीनामा न्यूज – राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले. म्हणून इगतपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी विभाग, असंघटित कामगार काँग्रेस, सोशल मीडिया विभाग, व्हीजे एनटी विभाग, विज्ञान विभाग आणि सर्व सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस कमिटीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी केले आहे.