
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची उद्या शनिवार दि. १९ ला त्र्यंबकेश्वर येथे भव्य सभा होणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या ह्या सभेसाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ना. अजितदादा पवार यांचे अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन या सभेत सर्वांना मिळणार आहे. म्हणून या सभेसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे.