
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हा पक्ष नसून विकासाभिमुख विचारधारा आहे. ह्या विचारधारेतून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हा पक्ष बळकट झाला आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ही घटना इगतपुरी मतदारसंघाच्या चांगल्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार इगतपुरी तालुकाध्यक्ष माजी सभापती पांडुरंग वारुंगसे यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत ताकदीने उमेदवार निवडून येईल असे भाकीतही श्री. वारुंगसे यांनी यावेळी केले. आमदार हिरामण खोसकर यांच्यासोबत मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, जेष्ठ नेते जनार्दन माळी, माजी सभापत्ती ज्ञानेश्वर लहाने, जेष्ठ नेते संपत सकाळे, माजी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, उपसभापती संपत वाजे, जयराम धांडे, दिलीप चौधरी आदी पदाधिकाऱ्यांचे पांडुरंग वारुंगसे यांनी सहर्ष स्वागत केले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले आदींच्या मार्गदर्शनानुसार इगतपुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तम कामगिरी करील असेही पांडुरंग वारुंगसे यांनी सांगितले.