त्र्यंबक खंबाळे येथे कुंटनखाना चालवणाऱ्या मानस लॉजिंगवर एलसीबीचा छापा : १ जण ताब्यात; मालक फरार ; बळीत महिलेची केली सुटका

इगतपुरीनामा न्यूज – आज शुक्रवारी दुपारच्या सुमाराला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे कुंटनखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे बनावट गिऱ्हायिक पाठवून हॉटेल मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे […]

वाडीवऱ्हे फॅब कंपनीजवळ सापडले अनोळखी व्यक्तीचे प्रेत : ओळख पटवण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांकडून आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ मुंबई आग्रा महामार्गावर फॅब कंपनीच्या समोर असलेल्या जंगलामध्ये एक अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रेत ३५ ते ५० या वयोगटातील इसमाचे असून प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही. ह्या मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. याबाबत कुणाला काहीही […]

टायर फुटल्याने स्कर्पिओ उलटली ; १० प्रवासी जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केली अपघातग्रस्तांना मदत

इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या स्कार्पिओ वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ प्रणाम हॉटेल भागात अपघात झाला. अचानक टायर फुटल्यामुळे हे वाहन उलटून अपघातग्रस्त झाले. आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. MH 18 W 5855 असा अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे. ह्या अपघातात वसिम लतीफ बागवान वय ३४, अहमद रजा वय १८, समशेर […]

वाडीवऱ्हेजवळ इको वाहन पलटी ; ८ प्रवासी जखमी : नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – मुंबईहुन नासिकला प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव इको वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. वेगात असलेले हे वाहन महामार्गावर वाडीवऱ्हे पोलीस चौकीजवळ पलटी होऊन अपघात घडला. ह्या अपघातात इको वाहनात प्रवास करणारे ८ प्रवासी जखमी झाले आहेत. कौशल्या आनंदा गायकवाड वय ६०, सावित्री यल्लय्या गुंजाळ वय ७०, अनिता […]

सिन्नरचे मुकुंद सारडा यांची आत्महत्या निष्पन्न ; इगतपुरीला आढळला मृतदेह 

इगतपुरीनामा न्यूज – सिन्नरचे बेपत्ता असलेले मुकुंद पुरुषोत्तम सारडा यांचा मृतदेह इगतपुरीजवळ फॉग सिटीच्या मागील बाजुला आढळला आहे. मुकुंद सारडा शुक्रवारी १२ एप्रिलला घरून दुकानात जातो सांगुन गेले मात्र ते दुकानात गेलेच नाही. दुसऱ्या दिवशीही घरी पोहचले नाही. कुटुंबियांनी नातेवाईकांकडे विचारपुस करूनही ते कोठेही आढळले नाही. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे. […]

तीन वाहनांचा विचित्र अपघात ; ४ जण जखमी : नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना आठवा मैल जवळ आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र भिषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. प्रविण भिका रोजेकर वय 52, हिरल प्रविण रोजेकर वय 46 या सिडको नाशिक, किसन अरूण धोंगडे वय 74, रुख्मिणी […]

मद्य तस्करी करणारे पुरवठादार एलसीबीच्या जाळ्यात : मद्य तस्करी करणारा हस्तक आशिष फिरोदिया अटक ; ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

इगतपुरीनामा न्यूज – निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ५ एप्रिलला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर छापा टाकला. त्यामध्ये ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव येथे गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याच्या ट्रकमधून गोवा राज्य […]

इगतपुरीत दिवसाढवळ्या पोलीस असल्याची बतावणी करून जेष्ठ नागरिकाची फसवणूक : जेष्ठ नागरिकांमध्ये वाढतेय चिंता

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील राममंदिर भागात ७१ वर्षीय जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्यात आली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून इगतपुरी शहरात यामुळे चर्चेला उधाण आले आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात संबंधित २ भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य स्रोत वापरून कसून तपास सुरु केला […]

ग्रामसेवक संतोष जाधव, उपसरपंच मंदा बेंडकोळी, ग्रा. पं. सदस्य ईश्वर बेंडकोळी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल : पिंपळगाव मोर येथील पेसा निधीतून ९ लाख ३१ हजाराची केली फसवणूक

इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर येथील तत्कालीन ग्रामसेवक संतोष मिठाराम जाधव, विद्यमान उपसरपंच मंदा गणेश बेंडकोळी आणि ग्रामपंचायत सदस्य ईश्वर उत्तम बेंडकोळी या तिघांवर आज घोटी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या तिघांनी ग्रामसभा ग्रामकोष अबंध ५ टक्के पैसा निधीमधून ९ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याबद्धल इगतपुरी […]

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार : वाडीवऱ्हे येथील युवकावर गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या सिडको परिसरात एकाने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोतील उत्तम नगर भागात राहणाऱ्या एका पीडितेची नितीन सुकदेव गवते, रा. वाडीवऱ्हे ता. इगतपुरी याच्याशी ओळख झाली होती. २०२० मध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला […]

error: Content is protected !!