नाशिक जिल्ह्यात सुई विरहित कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा : जिल्हा प्रशिक्षण केंद्रात इंडिया फर्स्ट निडल फ्री व्हॅक्सिनचे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न

सुभाष कंकरेज : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

नाशिक जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक सुलभतेने आणि १०० टक्के यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडिया फर्स्ट निडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांचे इन्स्ट्रुमेंट हाताळणीचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुईविरहित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयामार्फत हे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये कोविड १९ प्रतिबंधात्मक झायडस कंपनीची लस आता शासनामार्फत दिली जाणार आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड १९ लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले.

झायडस कंपनीने फार्माजेट हे इन्स्ट्रुमेंट तयार केले असून या इंस्ट्रूमेंटद्वारे लस दिली जाणार आहे. हे नीडल फ्री वॅक्सिंन असून आत्तापर्यंत एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना ती दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेविकांचे फार्मा जेट इन्स्ट्रुमेंट हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी डॉ. प्रकाश नांदापूरकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले. यामध्ये प्रत्यक्ष इन्स्ट्रुमेंट हाताळणी करण्यात आली. त्याला कशा पद्धतीने लस द्यायची याचा सर्व सर्व आरोग्यसेविकांकडून करून घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. हिमानी चांदेकर, वदक, उगले यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!