एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यातील निनावी ग्रामपंचायतीमध्ये पाटोदा गावाप्रमाणे मोफत पिठाची गिरणी, कांडप यंत्र खरेदी करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामस्थांना सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. यासह आगामी काळात शुद्ध थंडगार पाणी, गरम पाणी सुद्धा मोफत देणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच गणेश टोचे यांनी सांगितले. निनावी येथे कोविड योद्धा सन्मान सोहळा आणि ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदर्श गाव होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारी इगतपुरी तालुक्यातील निनावी ही पहिली ग्रामपंचायत आहे असे गौरवोद्गार इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी काढले.
प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगावचे आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोपाळराव गुळवे माध्यमिक विद्यालय निनावी येथील कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी इंगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, लोकनियुक्त सरपंच गणेश टोचे, उपसरपंच जिजाबाई भगत, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ कातोरे, महादू ढोन्नर, आशा गारे, शिलाबाई गायकवाड, सखाराम भगत, अनिता बगाड, ज्योती भोर, विमल कुंदे, ग्रामसेवक हंसराज बंजारा, शिपाई काळू भोर, पोलीस पाटील सीमा भोर, रेशीम विकास अधिकारी एस. व्ही. विसपुते, तलाठी सारिका रोकडे, वनरक्षक पाडवी, रेशीम उद्योजक नाना जाधव, मधुकर टोचे, दशरथ गायकवाड, चंदर भगत, नाना टोचे, रामनाथ टोचे, संजय गायकवाड, विष्णू टोचे, दिनेश सोनवणे, नवनाथ भोर आदी उपस्थित होते. ग्रामस्थ निनावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक हंसराज बंजारा, सूत्रसंचालन माध्यमिक शाळेचे शिक्षक बी. बी. भागवत यांनी केले.