इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गाची गेल्या सहा वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वे स्टेशन समोरील खड्यात वृक्षारोपण करण्यात आले.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विकाळीत झाली होती. याप्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. तहसीलदारांनी लवकरच रस्त्याचे काम मार्गी लावु असे यावेळी आश्वासन दिले. आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर यांनी या रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख मंजूर झाले असून लवकरच अजून २ कोटी रुपये रस्त्याच्या डागडुजीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती योगेश चांदवडकर यांना दिली.१४ ऑगस्ट पर्यंत रस्त्याचे खड्डे बुजवले गेले नाही तर भाजपा युवा मोर्चा, जनसेवा प्रतिष्ठान, जेष्ठ नागरीक संघ, श्रमजीवी संघटनेकडून १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसु असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर, जेष्ठ नागरीक संघाचे आर. परदेशी, अजित पारख, योगेश भारती, चंद्रभान गुप्ता, सचिन शिंदे, दिनेश चांडक, नगरसेविका अपर्णा धात्रक, सरचिटणीस कृष्णा परदेशी, आकाश शेलार, नयना पारख, प्रेरणा शेजवळ, शशिकांत भोंडवे, के. जी. विश्वकर्मा, सोमनाथ भोंडवे, विजय गुप्ता, राजेश परदेशी, देविदास करवा, चौधरी , चेतन चाफेकर, अस्लम शेख, सागर परदेशी, रामदयाल वर्मा, नितीन बोरकर, सुभाष भारती, आकाश खारके, चंद्रभान गुप्ता, आकाश शेलार, दिनेश शाही, सुनिल चांदवडकर, श्रमजीवी संघटनेचे संजय शिंदे यांच्यासह शहरातील त्रस्त नागरीक, व्यापारी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. ( बातमी लेखन : वाल्मीक गवांदे )