पिंपळगाव मोर येथे नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन

इगतपुरीनामा न्यूज (निलेश काळे) : पिंपळगाव मोर दि. ३१ : येथे आज नागरी सुविधा केंद्राचे उद्धाटन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील आदिवासी गावांतील नागरिकांना वेळप्रसंगी नागरी सुविधांसाठी घोटी किंवा इगतपुरी येथे जावे लागत होते. मात्र या केंद्रामुळे नागरीकांना ७/१२ उताऱ्यांपासून वीजबिलापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.कोरोना […]

घोटी ग्रामपालिकेच्या प्रभारी सरपंचपदी रामदास भोर यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज दि. २७ : इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ व तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या घोटी ग्रामपालिकेच्या प्रभारी सरपंच पदी रामदास भोर यांची निवड करण्यात आली. घोटी ग्रामपालिकेचे सरपंच सचिन गोणके हे रजेवर गेल्याने प्रभारी सरपंच म्हणून निवडीसाठी आज ग्रामपालिका कार्यालयात बैठक झाली. या बैठकीतच विद्यमान उपसरपंच रामदास भोर यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली.या […]

वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत तेजस भागडेला रजतपदक : घोटीत आगरी सेनेच्या वतीने सत्कार

इगतपुरीनामा न्यूज दि. 27 : छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग इंडिया या संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील खेळाडू तेजस चंद्रकांत भागडे या युवकाने ८५ किलो वजनी गटात राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत रजतपदक मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला. या दैदीप्यमान विजयाबद्दल या खेळाडूचे इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी कौतुक होत आहे.आजोबा कै. दादापाटील […]

काळूस्ते ते वणी पदयात्रेच्या संस्थापिका राधाबाई शिंदे यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ काळूस्ते ता. इगतपुरी येथील कै. राधाबाई सुरेश शिंदे ( वय ५६ ) यांचे निधन झाले. काळूस्ते ते सप्तश्रृंगी गड वणी येथे दरवर्षी निघणाऱ्या पदयात्रा दिंडीच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या गेल्या ३५ वर्षांपासून काळूस्ते येथील अंगणवाडी केंद्रात कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, पुतण्या, […]

केपीजी महाविद्यालयात वन दिनानिमित्त वृक्षारोपण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड केली. यावेळी लावलेल्या वृक्षांचे संगोपण करण्याची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. याप्रसंगी आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. भाबड यांनी […]

लॉकडाऊन वर्षपूर्तीच्या निमित्ताने..

लॉकडाऊन वर्षपूर्तीनिमित्त…. “पुन्हा असा अनुभव कुणालाही नको अशी ती भयावह परिस्थिती होती. आजार नवीन,व्हायरस नवीन,नेमकी काय ट्रीटमेंट ह्या आजाराला बरं करू शकेल ह्याचा पूर्ण जगाला काहीच थांगपत्ता लागत नव्हता.अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून आणि त्यातल्या त्यात होमिओपॅथी डॉक्टर म्हणून त्या काळात खूप कोविडच्या रुग्णांची होमिओपॅथी औषधांच्या माध्यमातून कोरोनाला प्रतिबंधात्मक व उपचार देखील करता आले. डॉक्टर असल्याचा […]

शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेतर्फे न्याहारी डोंगर भागात उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था इगतपुरी, पालघर, वाडा यांच्या मार्फत दिंडोरी येथील न्याहारीचा डोंगर भागात झाडांवर मडके लावून त्यामध्ये पाणी ठेवण्यात आले. उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने पक्षांचे मोठे हाल होतात. प्रसंगी पक्ष्यांचा जीव जातो हे लक्षात घेऊन शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या वतीने सागर पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सालाबादप्रमाणे याही वर्षी […]

चिमणी

काल झालेल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त मीनाक्षी काटकर यांची कविता चिमणी चिव चिव चिमणीआली अंगणी।हळूच म्हणालीदेता का पाणी॥ चिव चिव चिमणीबसली झाडावर।म्हणते मला कशीदाणे द्या पसाभर॥ चिव चिव चिमणीउडत गेली शेजारी।काकूला मागू लागलीगोड गोड पूरी॥ चिव चिव चिमणीआली बघा शाळेला।वाचवा हो चिमणीसांगितले सगळ्याला॥ मीनाक्षी काटकर – सहा.शिक्षिकाजि.प.प्राथ.शाळा टाकळी, पं.स.दारव्हा जि.यवतमाळ

पाडळी देशमुख फाट्यानजीक दुचाकी घसरून एक जण गंभीर जखमी : जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रूग्णवाहीकेची तप्तर सेवा

इगतपुरीनामा न्यूज दि. 20 : किसन काजळे (नांदूरवैद्य) : नाशिक – मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा सिलसिला सुरूच महिनाभरात सात ते आठ अपघातांच्या घटना घडल्या असून यामध्ये अनेक जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना ताज्या असतांनाच शनिवारी (दि.२०) रोजी राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी फाटा येथे मोटरसायकल स्लीप झाल्याने एक तरूण गंभीर जखमी झाल्याची […]

‘यिन’च्या जिल्हाध्यक्षा संध्या गव्हाणे यांचा ‘केपीजी’च्या वतीने सत्कार

इगतपुरीनामा न्यूज दि. १९ ( इगतपुरी ) : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. संध्या गव्हाणे यांची सकाळ माध्यम समूहाचे ‘यंग इनस्पिरेटर्स नेटवर्क’ ( YIN ) च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात, मिळालेल्या संधीचं सोनं करता […]

error: Content is protected !!