इगतपुरीनामा न्यूज (निलेश काळे) :
पिंपळगाव मोर दि. ३१ : येथे आज नागरी सुविधा केंद्राचे उद्धाटन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील आदिवासी गावांतील नागरिकांना वेळप्रसंगी नागरी सुविधांसाठी घोटी किंवा इगतपुरी येथे जावे लागत होते. मात्र या केंद्रामुळे नागरीकांना ७/१२ उताऱ्यांपासून वीजबिलापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
कोरोना काळानंतर सर्व उद्योगधंदे व आर्थिक स्थिती मंदावलेली असताना तरुणांनी पुढे येऊन नवीन व्यवसाय सुरू केल्याने गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापक काशिनाथ भोईर, पोपट चव्हाण, तक्षशिला अकॅडमीचे संचालक सागर मोहन, नागरी सुविधा केंद्राचे संचालक निलेश काळे, सुरेश मेंगाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.