इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
काळूस्ते ता. इगतपुरी येथील कै. राधाबाई सुरेश शिंदे ( वय ५६ ) यांचे निधन झाले. काळूस्ते ते सप्तश्रृंगी गड वणी येथे दरवर्षी निघणाऱ्या पदयात्रा दिंडीच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या गेल्या ३५ वर्षांपासून काळूस्ते येथील अंगणवाडी केंद्रात कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. काळूस्ते येथील पत्रकार मंगेश शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. काळूस्ते परिसरातल्या लहान मोठ्यांच्या त्या आई म्हणून प्रसिद्ध होत्या.