पाडळी देशमुख फाट्यानजीक दुचाकी घसरून एक जण गंभीर जखमी : जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रूग्णवाहीकेची तप्तर सेवा

इगतपुरीनामा न्यूज दि. 20 :

किसन काजळे (नांदूरवैद्य) :

अपघातग्रस्त दुचाकी

नाशिक – मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा सिलसिला सुरूच महिनाभरात सात ते आठ अपघातांच्या घटना घडल्या असून यामध्ये अनेक जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना ताज्या असतांनाच शनिवारी (दि.२०) रोजी राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी फाटा येथे मोटरसायकल स्लीप झाल्याने एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी २ वाजता घडली. जखमी तरूणास जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

नाशिक -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे जात असतांना अचानक मोटरसायकल क्रमांक (एम.एच.१९,बी.के.६०१७) या मोटरसायकलस्वाराची मोटरसायकल अचानक स्लीप झाल्यामुळे गाडी रस्ता सोडून बाजूला खोल जागेत जाऊन पडल्यामुळे या झालेल्या अपघातात दिपक धर्मा पाटिल (४६, रा. पाथर्डी गाव, ता.जि.नाशिक) हे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल आहे. अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या परिसरात अपघातांची मालिका सुरुच असून ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. अपघाताचा पुढील तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!