शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेतर्फे न्याहारी डोंगर भागात उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था इगतपुरी, पालघर, वाडा यांच्या मार्फत दिंडोरी येथील न्याहारीचा डोंगर भागात झाडांवर मडके लावून त्यामध्ये पाणी ठेवण्यात आले. उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने पक्षांचे मोठे हाल होतात. प्रसंगी पक्ष्यांचा जीव जातो हे लक्षात घेऊन शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या वतीने सागर पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सालाबादप्रमाणे याही वर्षी उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे पशु-पक्षांची पाण्यासाठी वणवण होत आहे. अशा वेळेस सर्वांनी एकत्र येऊन पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या वर किंवा अंगणामध्ये पाण्याची सोय केली पाहिजे असे आवाहन शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!