केपीजी महाविद्यालयात वन दिनानिमित्त वृक्षारोपण

इगतपुरी येथील के. पी. जी. महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्षारोपण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड. समवेत उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. आर. एम़. आंबेकर आदी.

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड केली. यावेळी लावलेल्या वृक्षांचे संगोपण करण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. याप्रसंगी आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. भाबड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व विशद करुन महाविद्यालयीन युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीचे कार्य हाती घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी. प्रा. यू. एन. सांगळे , प्रा. आर .एम. आंबेकर, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. श्रीमती एस.के. शेळके, प्रा. श्रीमती जे. आर. भोर, प्रा. जी. एस. लायरे उपस्थित होते. प्रारंभी प्रा. बी. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले. आभार प्रा. आर. एम. आंबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!